मराठा आरक्षणकरिता प्रसंगी बलिदानाची तयारी - विनायक मेटे
मुंबई, १ फेब्रुवारी/प्रतिनिधी
अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाचे हित जपण्याकरिता बलिदान दिले. त्याचप्रमाणे मराठा
समाजाला आरक्षण लागू करण्याकरिता बलिदान देण्याची आपली तयारी आहे, अशी ग्वाही मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज दिली. मराठा आरक्षणाला विरोध करणारे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांना मेटे यांनी टीकेचे लक्ष्य केले. रस्ता रोको, मंत्र्यांना घरात कोंडणे व त्यानंतर आरपारची लढाई, असा भावी आंदोलनाचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला.
राज्यातील सर्व जिल्ह्यांत मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याबाबत जनजागृती करणारा दौरा करून परतलेल्या मेटे यांनी ७२०० कि.मी. प्रवास करून १४५ जाहीर सभा घेतल्या. त्या दौऱ्याचा समारोप शिवाजी पार्क येथील आजच्या सभेने झाला. यावेळी यच्चयावत सर्व नेत्यांनी मेटे यांची तुलना अण्णासाहेब पाटील यांच्याशी केली. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील मराठय़ांचे अनभिषिक्त नेते असलेल्या शरद पवार यांना विनायक मेटे यांनी आव्हान दिल्याचे चित्र त्यांच्या समर्थकांच्या मनात निर्माण झाले आहे. खुद्द मेटे यांनीही सगळ्यांना सांभाळणाऱ्या बारामतीमधूनही आपल्याला भक्कम समर्थन असल्याचे स्पष्ट केले.
मेटे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाला आपल्या समाजातील काही लोकांकडून जास्त विरोध होत आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असलात तरी पहिले मराठा आहात हे विसरू नका. समाजातील जे बेईमान होतील त्यांचा बंदोबस्त करा. आम्ही मराठा समाजाबद्दल बोललो तर जातीयवादी ठरतो. मात्र समतावादी पुरोगामी ठरतात. याच मैदानावर काही दिवसांपूर्वी वाढदिवसाचा मेळावा झाला. त्यामध्ये मराठा समाज आमचा मोठा भाऊ असल्याचे सांगितले गेले. मात्र त्यानंतर काही दिवसांतच विपरीत भूमिका घेतली गेली. काल तर आरक्षणाला विरोध करणारी बैठक छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांनी घेतली. मराठा आरक्षणाला विरोध नाही पण.. अशी भूमिका घेणाऱ्या या नेत्यांच्या ‘पण’ला आम्ही विचारत नाही. मिलीजुली सरकार असते तसे हे भुजबळ व मुंडे यांचे आहे. ओठात एक आणि पोटात दुसरे असे असणाऱ्या या नेत्यांसह मराठा आरक्षणाला विरोध करणारे सारेजण आमचे कार्यकर्ते कडेला जाऊन उभे राहिले तर त्यामध्ये वाहून जातील, अशी टिप्पणीही त्यांनी केली. बापट अहवाल अन्यायकारक असल्याने आम्ही वापस केला, असे नमूद करून मेटे म्हणाले की, नवीन आयोगाचा फैसला लोकसभा निवडणुकीपूर्वी झाला पाहिजे. वेळकाढूपणा करण्याकरिता या निर्णयाचा वापर सरकारने करू नये. अन्यथा आम्हाला एक घाव दोन तुकडे करावे लागतील. १६ फेब्रुवारीपर्यंत सरकारने हालचाल केली नाही तर सर्व तालुक्यांत रस्ता रोको आंदोलन केले जाईल. त्यानंतर सरकार हलले नाही तर मंत्र्यांच्या घरात घुसून त्यांना कोंडून ठेवले जाईल. त्याउपरही आरक्षण लागू झाले नाही तर शेवटची लढाई आरपारची असेल मग त्यामध्ये कुणीही संपले तरी मागे फिरायचे नाही.
मधू चव्हाण, कांता नलावडे यांचे आरक्षणाला समर्थन
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी विरोध केल्याने पदत्याग करायला लागलेले भाजपचे आमदार मधू चव्हाण हे मराठा आरक्षणाच्या समर्थनाकरिता या मेळाव्याला हजर राहिले तर विधान परिषदेची उमेदवारी नाकारलेल्या कांता नलावडे यांनीही मेटे यांच्यासोबत व्यासपीठावर येऊन मुंडे यांच्या विरोधात अप्रत्यक्ष नाराजी प्रकट केली.
Tuesday, December 22, 2009
आरक्षणासाठी मराठा जात बदलणार नाही- शालिनीताई

ताठ मानेने जगणार्या मराठा समाजाने कधीच आरक्षणाची मागणी केलेली नसून कुटील राजकारण्यांचीच ही खेळी आहे. जातीवंत मराठा कधीच आरक्षणासाठी जात बदलणार नाही. आरक्षणासाठी मराठ्यांनी कुणबी होण्याची गरज नाही, अशी खरमरीत प्रतिक्रिया आमदार शालिनीताई पाटील यांनी 'वेबदुनिया' शी दूरध्वनीवरून बोलताना दिली. आरक्षण रद्द करून गुणवत्तेवर आधारीत आरक्षण दिले तरच सर्व समाजास न्याय मिळेल आणि जातीवादही संपुष्टात येईल असेही त्या म्हणाल्या.
मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करावा आणि त्यांना २५ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाजातील सर्व संघटनांच्या तर्फे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना भेटून काल करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
आरक्षण आर्थिक निकषावर हवे
''मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात माझी भूमिका नाही तर मराठ्यांबरोबरच मुसलमान, जैन, ब्राह्मण व समाजातील सर्व घटकांना आर्थिक निकषावर आधारीत आरक्षण मिळाले पाहिजे, असे सांगून त्या म्हणाल्या, गोरगरीब व गुणवत्ताधारकांना आरक्षण मिळाले तरच देशाची आणि समाजाची उन्नती होणार आहे. हीच भूमिका घेऊन गेल्या काही वर्षांपासून मी महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती केली. ती लोकांना पटल्यामुळे केवळ मताचे राजकारण करणार्या कुटील राजकारण्यांच्या पायाखालची वाळू घसरली.
ही राजकारण्यांची खेळी
''मला शह देण्यासाठी याच राजकारण्यांनी समाजातील काही लोकांचे बाहुले उभे करून मराठ्यांच्या आरक्षणाची खेळी खेळली आहे. पण, आजपर्यंत ताठ मानेने जगलेल्या मराठा समाजात गुणवत्ता आहे. तो सुज्ञ आहे. जातीसाठी माती खाणारा नाही. आरक्षणासाठी कोणताही मराठा आपली जात बदलणार नाही आणि आरक्षणासाठी मराठ्यांनी कुणबी होण्याची गरजच नाही. मराठा आणि कुबणी समाज एकच आहे, असे काहीजण सांगत आहेत. असे असेल तर कुणबी समाजाला आरक्षण मिळते आणि मराठा समाजाला का मिळत नाही? याचे त्यांनी उत्तर द्यावे़,'' असे त्या म्हणाल्या.
डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी शब्द पाळावा
''समाजातील तळागाळातील घटकाच्या उन्नत्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींजींकडून केवळ दहा वर्षासाठी आरक्षण मागून घेतले होते. हे सर्व लिखित स्वरूपात झाल्यानंतर आरक्षणाची पध्दत सुरू झाली. मात्र, अजूनही जातीवर आधारीत आरक्षण सुरूच आहे. आज डॉ. आंबेडकर हयात असते तर त्यांनी आपला शब्द निश्चित पाळला असता. त्यांच्या अनुयायांनी हा शब्द पाळला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
हे तर मते मिळविण्याचे राजकारण
आरक्षणासारख्या निर्णयामुळे देशावर, समाजावर काय परिणाम होईल याचा कोणीच विचार करीत नाही. मुळ प्रश्नाला बगल दिली जात आहे, असा आरोप करून त्या म्हणाल्या, ''लाचार राजकारणी तत्व विसरून केवळ आपल्या मताच्या पेट्या भरण्यासाठी खटाटोप करत आहेत. म्हणूनच मला क्रांती सेनेच्या वतीने बंडाचे निशाण हाती घ्यावे लागले. जातीच्या आरक्षणाच्या कुबड्या काढून टाकून समाजातील, मग तो कोणत्याही जातीचा असो, गोरगरीब व गुणवत्ताधारकांना आरक्षण मिळाल्यास देशाचा विकास होणार आहे. अथवा देश-समाज मोठा करण्याचे स्वप्न विरून जाईल.''

अहंकार नडला नि मराठा मागे पडला
अहंकार नडला नि मराठा मागे पडला- खेडेकर
'खालच्या जातीत गेल्यामुळे आपल्याला कमी लेखले जाईल. या विचारामुळेच मराठा समाजाने आतापर्यंत कधी आरक्षण मागून घेतले नाही. पण या आधीच्या पिढीचा हा अहंकार किंवा अज्ञान पुढच्या पिढीला नडला आहे. त्यामुळेच या पिढीला आरक्षणाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे, असे मत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी वेबदुनियाशी बोलताना व्यक्त केले.
मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करावा आणि त्यांना २५ टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाजातील सर्व संघटनांच्या तर्फे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना भेटून काल करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कायम सत्तेत असणारा, शिक्षणासह महत्त्वाची क्षेत्रे ताब्यात ठेवणार्या या समाजाला आरक्षणाची गरज का भासावी हे जाणून घेण्यासाठी श्री. खेडेकर यांच्याशी चर्चा केली. आरक्षणाच्या समर्थनार्थ त्यांनी अनेक मुद्दे मांडले. त्यांच्याशी नितिन फलटणकर यांनी केलेली ही बातचीत...
प्रश्न: आतापर्यंत मराठा समाजाचेच नेतृत्व महाराष्ट्राला लाभले होते, मनोहर जोशी वगळता बहुतांश मुख्यमंत्री हे मराठाच होते. तरीही मराठा समाजाचा विकास झाला नाही?
खेडेकर: हे खरं आहे. आतापर्यंत राज्यात मराठा समाजाचेच नेतृत्व होते. किंबहुना स्वतंत्र्य महाराष्ट्रानंतर मराठा समाजालाच हा बहुमान मिळाला. परंतु मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या कोणत्याही मराठा नेत्याने कधीही केवळ समाजाचा विचार केला नाही. त्या नेत्याने महाराष्ट्राचाच विचार केल्याने त्याने कधी समाजाला आपण आरक्षण मिळवून द्यावे यासाठी प्रयत्न केले नाही. आणि परिणामी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही कालबाह्य होत गेली.
प्रश्न: मराठ्यांना आता आरक्षणाची गरज का भासत आहे?
खेडेकर: आतापर्यंत केवळ अज्ञान म्हणा किंवा अहंकार. मराठा समाजाने आरक्षणाकडे दुर्लक्ष केले. आपण आरक्षण मागितले तर तो आपला कमीपणा ठरेल असे मत काहींचे होते. यामुळे आरक्षणाचा प्रश्न मागे पडत राहिला. आज घडीला इतर समाजातील मुलांनी आपली प्रगती करून घेतली आहे. अनेक जण परदेशात आहेत, मराठ्यांची पोरं मात्र आजही गुरं- ढोरं राखताहेत. हे झालं ते केवळ आरक्षण नसल्यामुळे. आता पुढच्या पिढीला आरक्षणाची गरज भासत आहे. त्यांना त्यांच्या प्रगतीसाठी आरक्षणाचा आधार हवा आहे, हा त्यांचा हक्क आहे, तो त्यांना मिळत असेल तर त्यात वाईट ते काय?
प्रश्न: आगामी काळातील निवडणुकांना डोळ्यांपुढे ठेवून या प्रश्नाचे राजकारण करण्यात येत आहे का?
खेडेकर: नाही. असं म्हणणे चुकीचे ठरेल. हा राजकारणाचा प्रश्न नाही. हा समाजाचा प्रश्न आहे. एका विशिष्ट समाजाला आतापर्यंत आरक्षण देण्याचे टाळले गेले. आता ते मिळत आहे यात राजकारण आलेच कुठे? निवडणुकांचे म्हणाल तर आपला देश लोकशाही प्रधान असल्याने आपल्या देशात 12 महिने निवडणुका असतात, मग कोणताच प्रश्न काढायचा नाही का? निवडणुकांना अजून अवकाश आहे. आणि तोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर जनतेकडेच असेल.
प्रश्न: आरक्षण मंजूर झाले तर फायदा काय?
खेडेकर: फायदा काय म्हणजे? आतापर्यंत आरक्षण न मिळाल्याने जे नुकसान झालेय ते तरी भरून निघेल. आरक्षण मिळाल्याने मराठा समाजाचा दर्जा सुधारेल. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. शिक्षण क्षेत्रात आजही मराठ्यांची वाईट परिस्थिती आहे.
प्रश्न: पण राज्यातील बहुतांश शिक्षण संस्थाही मराठ्यांच्याच ताब्यात आहेत ना?
खेडेकर: आहे, पण फायदा काय? मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मराठा समाजाने स्वतः:चा विचार कधीही केला नाही. त्यामुळे अजूनही शिक्षणातही मराठे मागेच आहेत. आरक्षणानंतर त्यांना त्यांचा अधिकार तरी मिळेल.
प्रश्न: मराठा समाजाला चांगले नेतृत्व मिळत गेले. परंतु अजूनही विकास का झाला नाही?
खेडेकर: त्याला कारणही मराठा समाजच आहे. मराठा चळवळ काळाच्या ओघात मागे पडल्याने मराठ्यांना आरक्षणाच्या मुद्द्याचा विसर पडला होता. आता त्यांना त्याची जाणीव झाली आहे. आणि आरक्षण त्यांना मिळालेच पाहिजे.

मराठा समाजाला आरक्षण का हवे?
मराठा समाजाला आरक्षण का हवे?
मराठा म्हणून अभिमानाने मिरवायचे पण घरची स्थिती मात्र दयनीय, अशी अवस्था आहे. अशातच आरक्षण नाही म्हणून इतर कुठे संधीही नाही. शिवाय लग्न कार्ये अगदी थाटात मानाला शोभेल अशी पार पाडली पाहिजे, असा दंडक. त्यामुळे कर्ज काढून हे सगळे साजरे करायची सवय.
महाराष्ट्रात निवडणुकीचे नगारे वाजू लागले असताना मराठा समाजास आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी मराठा समन्वय समितीच्या नेत्यांना न्यायमूर्ती बापट अहवालावर विधी व न्याय विभागाचे मत घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मराठा आणि कुणबी या दोन जाती नसून विदर्भ आणि कोकणात त्यांच्यात फारसा फरक नसल्याची भूमिका मांडून ओबीसीत समावेश करून मराठा समाजास शिक्षण आणि नोकर्यात २५ टक्के आरक्षण द्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशी रोखठोक भूमिका समन्वय समितीने छत्राखाली एकत्र आलेल्या मराठा समाजाच्या दहा संघटनांनी घेतली आहे. सर्वच समाजघटकात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याची भूमिका घेतानाच मराठा समाजास आरक्षणाच्या समर्थनार्थ राजस्थान, तामिळनाडू आणि कर्नाटकात मागासांना अनुक्रमे ६५, ६९ आणि ७२ टक्के आरक्षण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
राज्यकर्ती जमात
महाराष्ट्रात मराठा समाज हा कायम सत्तेत राहिला आहे. किंबहूना राज्यकर्ते ते मराठा ही परंपराच निर्माण झाली. इतिहासकाळापासून ते अगदी आतापर्यंत तेच घडत आले आहे. या जातसमूहाची संख्याही इतर घटकांपेक्षा अधिक म्हणजे चाळीस ते बेचाळीस टक्क्यांच्या आसपास आहे. (१९३१ नंतर जातिनिहाय खानेसुमार झाली नसल्याने अचूक आकडेवारी ज्ञात नाही) मराठा जातसमूह सुरूवातीपासूनच लष्कर आणि शेतीशी संबंधीत आहे. यामधील पंचकुळी, शहाण्णवकुळी वतनाशी संबंधित होते तर कुणबी हे प्रामुख्याने शेतीशी संबंधित होते.
राज्यात सत्तेसोबतच शिक्षणसम्राट, उद्योगमहर्षी, सहकारसम्राट, साखरसम्राट, यासारखी सम्राटांची बिरूदावली मराठा समाजाकडेच असल्याचे लक्षात येते. पण या सगळ्या सम्राटांनी आपल्या समाजासाठी काय केले?
मराठ्यांमधील खालचा थर मागासच
मराठा हा समाज म्हणून राज्यात एक असला तरी प्रांतनिहाय त्यात भेदही आहेत. हा भेद आता ठळकपणे आर्थिक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज हा राज्यातील इतर भागांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. शेती, सहकार आणि सत्ता या बळावर या समाजाने प्रगतीची मोठी मजल मारली आहे. राज्याच्या सत्तेतही या भागातील मराठ्यांचेच वर्चस्व राहिले आहे. पण ही स्थिती संपूर्ण राज्याची नाही. मराठवाडा, विदर्भ या भागातील मराठ्यांचे तसे नाही. एक तर जमिन असली तरी शेतीसाठी पाणी नाही. याशिवाय अनंत अडचणी यामुळे या समाजासाठी प्रगतीची दारे उघडली गेली नाही.
कापे गेली भोके उरली
मराठा म्हणून अभिमानाने मिरवायचे पण घरची स्थिती मात्र दयनीय, अशी अवस्था आहे. अशातच आरक्षण नाही म्हणून इतर कुठे संधीही नाही. शिवाय लग्न कार्ये अगदी थाटात मानाला शोभेल अशी पार पाडली पाहिजे, असा दंडक. त्यामुळे कर्ज काढून हे सगळे साजरे करायची सवय. त्यामुळे कर्जबाजारीपणाही जडलेला. पाटीलकी, इनामदारकी संपली असली तरी कापे गेली भोके राहिली अशी अवस्था. तरीही 'मराठा जातीसाठी माती खाणार नाही' हा ताठर अभिमान कायम. अशा परिस्थितीत समाजातला विकास दिसतो तो फक्त वरच्या थरावरच. खालचा थर मात्र अज्ञान, अविकासात चाचपडत बसलेलाच राहिला. त्याला वरच्या थराने वर यायलाही मदत केली नाही.
जातीसाठी माती खाणार नाही
आताही मराठा समाजाला आरक्षणासाठी विरोध करणार्यात पश्चिम महाराष्ट्रातील मराठाच आहेत. कारण आजही ते जातीला आणि त्याबरोबर येणार्या मानमरातबाला चिकटून आहेत. आरक्षणासाठी कुणबी होणे त्यांना मान्य नाही. शालिनीताई पाटील या मराठा नेत्यांनीही आरक्षण द्यायचेच असेल तर मराठा जातीला द्या, त्यासाठी कुणबी व्हायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या समाजात आजही लग्ने होताना समोरचे कुटुंब तालेवार आहे ना हे पाहिले जाते. त्यामुळे आरक्षणाच्या कुबड्या घेऊन आपण काही मिळवावे ही भावना त्यांच्यात नाही. पण ही स्थिती पूर्ण समाजाची नाही. हे फक्त वरचे चित्र आहे. त्यांच्या अट्टाहासापायी खालच्या मराठा समाजाच्या संधी मात्र हिरावल्या जात आहेत.
'सम्राटां'नी समाजासाठी काय केले?
मंडल आयोगानंतर झालेल्या सामाजिक स्थित्यंतरात मराठा जातसमूहातील एकेकाळी दुर्लक्षित कुणबी घटक आरक्षणाची फळे चाखत असताना उगाच मराठा म्हणून प्रतिष्ठा जपायची आणि संधींना मुकायचे, यात काय अर्थ याचा गांभीर्याने विचार सुरू झाला.
राज्यात सत्तेसोबतच शिक्षणसम्राट, उद्योगमहर्षी, सहकारसम्राट, साखरसम्राट, यासारखी सम्राटांची बिरूदावली मराठा समाजाकडेच असल्याचे लक्षात येते. पतंगराव कदमांपासून दत्ता मेघेंपर्यंत आणि विखे पाटलांपासून मोहिमे पाटलांपर्यंत मराठ्यांनी शिक्षण, सहकार या क्षेत्रात वर्चस्व राखले आहे. पण या सगळ्या सम्राटांनी आपल्या समाजासाठी काय केले असे विचारण्याची वेळ आली आहे. आरक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजाला शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, असे आरक्षण मागणार्यांचे म्हणणे आहे. मग या शिक्षणसम्राटांनी आपल्याच समाजबांधवांसाठी आपल्या शिक्षणसंस्थांचे दरवाजे खुले का केले नाहीत? की परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी मजबूत फी घेण्यासाठीच ती उघडी असतात. आपल्याच जातीच्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी बंद का होतात? वसंतराव नाईक, सुधारकरराव नाईक व मनोहर जोशी यांचा अपवाद वगळता मराठा समजाचाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. असे असतानाही मराठा समाजाचा विकास का होऊ नये. राजसत्ता हाती असल्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदेही त्या समाजाला मिळत असतात. मग मराठा समाजच यातून मागे का राहिला?
सहकार चळवळ दावणीला
सहकारी चळवळीतल्या मराठ्यांनी सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आणि तिला दासी बनवली. वर्षानुवर्षे ती त्यांच्याकडे राहिली. साखर कारखाना असो वा कोणतीही संस्था, पतसंस्था वर्चस्व याच कुटुंबाचे. यांचे प्रतिस्पर्धीही त्यांच्याच समाजाचे. आलटून पालटून सत्ता त्यांच्याकडेच. आपल्याला निवडून देणार्यांसाठी ही सत्ता त्यांनी कधी राबवलीच नाही. फायदा करून घेतला तो फक्त स्वतःचाच. मग विकास त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल? मराठा जातीसमूहातील उपेक्षित समाजघटकापर्यंत सत्ता, सहकार, कारखानदारी, आर्थिक सुबत्तेतेचे अधिकार पोहचलेच नाहीत. राज्यकर्ती जमात असल्याने आरक्षणाच्या माध्यमातून विकास साधण्याची संधीही नाही, अशा विचित्र अवस्थेत हा समाज सापडला आहे.
आता डोळे उघडले
शिक्षणप्रसार, सामाजिक जागृती आणि आर्थिक उदारीकरणानंतर राज्यातील इतर मागास समाजघटकांनाही सुबत्ता, समृद्धीची वाट सापडल्याने त्यांनी नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करण्यास सुरूवात केली. हे सामाजिक चित्र स्पष्ट झाल्यानंतर मराठा समाज खडबडून जागा झाला. मंडल आयोगानंतर झालेल्या सामाजिक स्थित्यंतरात मराठा जातसमूहातील एकेकाळी दुर्लक्षित कुणबी घटक आरक्षणाची फळे चाखत असताना उगाच मराठा म्हणून प्रतिष्ठा जपायची आणि संधींना मुकायचे, यात काय अर्थ याचा गांभीर्याने विचार सुरू झाला. म्हणूनच आर्थिकदृष्ट्या मागास मराठ्याच्या उद्धारासाठी सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आवाज बुलंद व्हायला सुरूवात झाली. त्याची राजकीय प्रतिक्रिया उमटणेही साहजिकच आहे. सत्तेची समीकरणे बदलण्याची क्षमता मराठा जातसमूहात असल्याने राज्यकर्त्यांना त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे शक्य नसून निवडणुकीच्या तोंडावर तर ही चूक करण्याचे साहस कोणतेही सरकार करणार नाही. हे लक्षात घेता या मुद्दयावर निवडणुकीपूर्वी निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री विलासरावांचे आश्वासन अपेक्षितच आहे.

मराठा आरक्षण लढ्यात एकजूट दाखवावी
मराठा समाजाचा विकास ज्या गतीने होणे अपेक्षित होता, तो झाला नाही. नव्या काळातील गरजेनुसार हा विकास होण्यासाठी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी उभारलेल्या लढ्यात समाजाने एकजूट दाखविली पाहिजे, असे आवाहन ||मराठा ||
Friday, December 18, 2009
मराठा आरक्षण आज काळाची गरज आहे.......?
मराठ्यांच्या आरक्षणाला आक्षेप घेणारे भुजबळ कोण.त्यांना कोणी दिला हा मक्ता.
नागपूर - राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या पण सामाजिक आणि आर्थिकद्ष्टया कमकूवत असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात हरकत नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता भूजबळ यांनी हे वक्तव्य केले.
महाराष्ट्र आणि देशाच्या ऐतिहासिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचा वाटा उचलणारा मराठा समाज अद्यापही उपेक्षित आहे. समाजातील मुठभर वर्ग श्रीमंत असला म्हणजे सर्व समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे, असे मानणे चुकीचे आहे. ही परिस्थिती दुर करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे विधिमंडळासमोर धरणे आंदोलन देण्यात आले. या आंदोलनात मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड, छावा संघटनेच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील जवळपास 25 आमदारांनी घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र, यावेळी विदर्भातील एकाही आमदाराला भेट देण्याचे सौजन्य दाखविता आले नाही. धरणे आंदोलनानंतर मराठा संघटनांच्या 11 जणांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि महसूलमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. राणे आणि मोघे मंत्रिमहोदयांनी 11 लोकांच्या शिष्टमंडळास मुंबई येथे वेळ देण्याचे कबूल केले. या शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, संभाजी बिग्रेडचे प्रदेश सचिव मनोज आकरे, अ.भा. मराठा महासंघाचे उपाध्यक्ष विनायकराव पवार, छावा मराठा संघटनेचे किशोर चव्हाण, आनंद आडकिणे, अ.भा. मराठा महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश साळूंके, मराठा सेवासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार शिंदे, शुधांशू मोहोड, माणिकराव जगताप, विजय गुजर आदींचा समावेश होता, अशी माहिती नागपूर जिल्हाध्यक्ष सतिश साळूंके यांनी दिली. !! आन्नासहेब चौधरी !!

Saturday, October 17, 2009
शिवचरित्रातून काय शिकावे?
“मराठा साहित्य अणि अजागृत मराठा समाज ”
“मराठा साहित्य अणि अजागृत मराठा समाज ”1. मराठा महानायक संभाजी महाराज यांनी 4 ग्रन्थ लिहले
a.बुधाभुशन b.सातसतक c.नैकभेद d.नाखाशिका (अर्यांनी ते नष्ट केले त्याचे काही अवशेष बाकि आहेत )
2. “ग्रुतासमद ” हा जगातील पहिला ग्राथाकर हा मराठा होता .त्याने रुग्वेदाच्या पहिल्या भागाची निर्मिती केलि . त्याने कापसाची प्रगत जात ही शोदून कडली .
3. रुग्वेदाचा दहावा भाग हा “कव्शायेलुषा ” याने निर्मिला तो ओलिताच्या शेतीची व्यवस्ता पाहत असे त्याने कायद्याच्या ग्रंथाची निर्मिती केलि (अर्यांनी त्याचे ग्रंथ नष्ट केले)
4. ज्याच्या नावाने एअर्थ ला पृथ्वी हे नाव मिळाले तो “प्रुथुराजा ” हा मराठा होता.त्याने कृषि विद्देत अनेक ग्रन्थ निर्मिले
5. भारतीय लेखन कलेचा प्रराम्भा सिंद्धु लिपि ( भाषा ) पासून मानला जातो टी मराठा भाषा आहे
6. चार्वाक दर्शन हे मर्ता साहित्य आहे
7. जगातील सर्वात प्रथम अर्थाशास्ता हे मराठा निर्मित होत (अर्यांनी ते नष्ट केले)
8. आयुर्वेद (पूर्वीची आयुर्विद्द्य ) हे शरीर शास्त्र मराठा निर्मित आहे आर्य अक्क्रमना पूर्वी ते शिंदु संस्कृतीत वापरले जात होते .
9. जगातला पहिला सर्जन “चरक ” हा मराठा होता
10. योगाचार्य व श्रेष्ठ तत्त्ववेत्ता “पतनजाली ” हा मराठा होता सद्द्याचे रामदेव बाबा हे शेतकरी कुतुम्बातिल आहेत
11. पाणिनि हा मराठा जगत विख्यात व्यकरानकर्ता , भाषाकार होवून गेले
12. श्रीकृशान्ना , राजाराम हे अनुक्रमे जाधव व भोसले कुलातले होते(वाचा 4 थी इतिहास पुस्तक जिजाऊ च्या तोंडी हे वाक्य आहे) कृष्ण निर्मित गाथा ही मराठा साहित्या आहे
13. गोतम बुद्ध हे शेतकरी कुतुम्बातिल तसेच राजपुत्र होते. “त्यांनी समपूर्ण मानव जातीवर अद्द्यात्माची प्रचंड मोटी लाट आणली . त्यांच्या रुदयाच्या एक कण जरी मला मिलला तर मी जगातील सर्व श्रेष्ठ ज्ञानी जालो असतो ” असे स्वामी विवेकानंद म्हणतात त्यांचे साहित्य हे मराठा साहित्य
होते
14. जगातील पहिली संस्कृति ही सिंदु संस्कृति आहे त्या संस्कृतीचा धर्मं हा “शिव धर्मं ” होता. “त्यांचा देव “शिव शंकर ” हा आहे (अरयांनी शिव दर्म नष्ट केला व शिवाला तीसर स्थान दिल (भ्रम्म , विष्णु नंतर ),त्याला विनाश करणारा सांगितल .महत्व कमिकेल तरीही मराठा महादेव आजही जन माणसाच्या मनात घर करुण आहे. (माज्या महादेव तुजा धर्मं तुजी लेकर पुन्ना जागा करतील . हर हर महादेव) शिव धर्म साहित्य हे मराठा साहित्य आहे
15. “नामदेव रचिला paya tuka zalase kalas” Namdevani jya bhagvatdharmachi sthapana keli to shiv dharmachach yek bhag vota namdevanchyach prerne tun shikha dharma stthapan zala. “Guru grantha sahib” maddhe namdevanche anek abhang ahet. Namdev te tukoba ya santanche sahitya he Maratha sahittya ahe
16. डॉ . आ . ह. सालुंखे yanni Maratha sahittyat navi kranti keli ahe . tyanche sahittya vacha.
17. Tukobanni 5000 – 6000 abhang lihun yek parakram kela. Te sarv abhang brahaman aryanni indrayanit budavale
(tyachya prati matra vachalya)
tyanla dharm drohi ghoshit kele. Tyanla ana vachun marle
MHANUN MHANTO “UTTHA MARATHA JAGA HO PARIVARTANACHA DHAGA VO”.TUMHALA SHAPTHA TYA TUKOBACHI, TYANCHYA GATHECHI,NAMSHESH ZALELYA MARATHA SAHITYACHI MARATYAN NO JAGE VHA YATTA TARI MARATHA SAHITYA VACHA SHIV – PULE – SHAHU – PRABODHANKAR THAKRE YANCHE SAHITYA VACHA. GULAMICHYA ANDHARAT MARU NAKA. APALA ITIHAS VACHA “JE ITIHAS VACHATAT TECH ITIHAS GHADAVTAT” HE VISARU NAKA. BRAHMANI GULAMICHYA SRUNKALA TODO . UTTHA, UTTHA, UTTHA, UTTHA, MARATHANN JAGE ho
Thursday, June 4, 2009
समाजातील मोठा घटक असणाऱ्या मराठा समाजावर हा अन्याय आहे.

भारतीयांवर मनुवादी विचाराने व मनुस्मृतीच्या कायद्याने मोठा अन्याय केले आहे. मनुस्मृतीमुळे देशातला बहुसंख्य असलेला बहुजन समाज हक्क अधिकारापासून वंचित राहिला. ब्राह्माण, क्षत्रिय, वैश्य व शूद असे चार वर्ण परंतु कलियुगामध्ये ब्राह्माण व शूद हे दोनच वर्ण, यातील ब्राह्माण संपूर्ण अधिकार संपन्न व शूद हे अधिकार वंचित शूदांना सप्तबंदी लागू होती. यातील शिक्षण, संपत्ती, शस्त्र, रोटी, बेटी, तट व समुद उल्लंघन या सात बंदी यामुळे शूदवर्णाचे लोक अशिक्षित व दरिदी जीवन जगत होते. धर्मशास्त्राप्रमाणे शूद वर्णाच्या व्यक्तीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे डोळे काढावे, त्याची जीभ छाटावी व त्याच्या कानात शिसे ओतावे असा धर्म कायदा होता. सप्त बंदी कायद्याचा आधार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. संत तुकाराम महाराजांची गाथा बुडविली. छत्रपती शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांचे वेदोक्त प्रकरण गाजले आहे. मराठा समाज हा हक्क अधिकारापासून वंचित होता. म्हणजेच तो शूद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याने ख-या अर्थाने नवीन युगाला सुरुवात झाली. त्याची प्रेरणा घेऊन ब्रिटीश राजवटीमध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी शूद समाजाला प्रबोधित करून आपल्या हक्कासाठी लढण्यास उद्युक्त केले. महात्मा जोतिबा फुले यांनी ब्रिटिशांकडे शूदवर्णाच्या अशिक्षित गोरगरीब समाजाला शिक्षण व विशेष सवलती देण्याची प्रथम मागणी केली. 'गुलामगिरी' या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी शूद व अतिशूद समाजाची म्हणजेच शेती व शेतीवर उपजीविका करणाऱ्या लोकांची व्यथा मांडली आहे. शूद वर्ण म्हणजेच मराठा व आजचा इतर मागासवर्ग. अतिशूद म्हणजे अस्पृश्य व आदिवासी समाज, ज्याला आज आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणतो. महात्मा फुले यांनी शूद अतिशूदांसाठी मोठा सामाजिक लढा उभा केला. हे कार्य पुढे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानामध्ये चालू केले. त्यांनी मोफत शिक्षण, मुलांसाठी सर्व जातींचे वसतीगृह व बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या राज्यामध्ये ५० टक्के आरक्षणाची व्यवस्था केली. त्यांनी ब्राह्माण, शेणवी, कायस्थ, पारशी वगळता उर्वरित मराठा बहुजन समाज हा शूदवर्णाचा असून शेतीवर उपजीविका करणारा अडाणी वर्ग आहे म्हणून त्यांना आरक्षण घोषित केले. छत्रपती शाहूमहाराजांच्या या कार्याचे प्रतिबिंब म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. त्यांनी अतिशूद वर्णाच्या लोकांना आरक्षणाची व्यवस्था केली. १५ टक्के अनुसूचित जाती, साडेसात टक्के अनुसूचित जमातीसाठी ३४१ व ३४२ कलम टाकले व इतर मागासवगीर्यांसाठी ३४० कलमानुसार आयोग नेमण्याची व्यवस्था केली. ३४० व्या कलामानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित कराण्यास व आरक्षणाचा लाभ देण्यास भारत सरकारने चाल-ढकल केल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला व इतर मागासवगीर्यांच्या हक्क अधिकारासाठी लढा दिला. भारतातील पहिला इतर मागासवगीर्यांसाठीचा आयोग म्हणजे १९५३ चा खा. काका कालेलकर आयोग. या आयोगाचे काम इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित करणे व त्यांच्या उन्नतीसाठी सूचना करणे हे होते. या आयोगापूवीर् ब्रिटीश राजवटीमध्ये आठ आयोग जाती निश्चिती करण्यासाठी झाले होते. त्यांनी काढलेले निष्कर्ष हा होता की १. शूद वर्णाचे लोक, २ ब्राम्हणेतर लोक. ३ शेती करणारे व शेतीवर उपजिविका करणारे म्हणजे इतर मागासवगीर्य लोक या आधारे व एकूण भारत देशाचा अभ्यास करून कालेलकरांनी २३९९ जाती निेश्चित केल्या. यामध्ये मराठा समाजाचा मराठा म्हणून समावेश केला आहे. परंतु हा अहवाल लागू करण्यात आला नाही. पुढे १९७७ मध्ये मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने ३७४३ जाती निेश्चत केल्या. १३४४ जाती वाढवल्या. पण शूदवर्णाच्या व शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला वगळले, याची त्यांनी कुठलीही कारणे दिली नाहीत. हा सरळ सरळ मराठा समाजावर अन्याय झाला आहे. मात्र देशभरामध्ये मराठा समाजासारखे जीवन जगणारे जाट, कुमीर्, अहिर, यादव, रेड्डी, गौडा, नायर व महंतो यांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात माळी, धनगर, वंजारी, तेली हेही सामाविष्ट झाले आहेत. १९९० मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा झाली. त्याला सवोर्च्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे १९९५ पर्यंत मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली नाही. इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकार या याचिकेमध्ये मागणी केली नसताना सवोर्च्च न्यायालयाने एक अन्यायकारक निर्णय देऊन ५० टक्केची मर्यादा घातली. केंद सरकारने नेमलेल्या खासदार नचिपन कमिटीने मात्र ही मर्यादा घटनाबाह्य असून ती रद्द करावी अशी शिफारस केंद सरकारकडे केली आहे. केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकमध्ये ६९ टक्के, आंध्रात ६५ टक्के, राजस्थानात ६५ टक्के, महाराष्ट्रानेसुद्धा ५२ टक्के मर्यादा ओलांडली आहे. आता ५२ टक्के ओ. बी. सीं. ना ५२ टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. जो महाराष्ट्रात फक्त १९ टक्के मिळत आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे सध्या फक्त पहिल्या टप्प्यातील नोकरीचा लाभ मिळत आहे. पण पदोन्नती, शिक्षण व राजकारणातला लाभ मिळत नाही. यावर मराठा व इतर मागासवगीर्य समाजाने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. मराठा समाज ही जात नसून हा एक समूह आहे. आजच्या मराठ्यांची जात ही कुणबी आहे, हे अनेक वेळा ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध करता येते. देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो. भारतीय सैन्यामध्ये मराठा बटालियन आहे. 'मराठा मेला तर राष्ट्रही मेले. 'मराठा विना राष्ट्र गाडा न चाले' असे म्हटले जाते. महाराष्ट्रात राहणारा तो मराठा. मराठी बोलणारा तो मराठा म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बारा बलुतेदार मावळ्यांना मराठा संबोधले जात होते. यावरून स्पष्ट होते की मराठा ही जात नसून प्रदेशवाचक शब्द आहे. महात्मा फुले हे शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणजे कुणब्यांचा राजा असे म्हणतात. १८८१ च्या जनगणेमध्ये मराठा व कुणबी या भिन्न जाती नसून एकच आहे. नंतर बॉम्बे गॅझेटियरप्रमाणे मराठा व कुणब्यांमध्ये भेदाभेद नाही. मराठा कुणीबीचे विवाह न्यायालयाने वैध ठरवले. गॅझेटियर ऑफ इंडियानुसार मराठा-कुणबी यांच्यात फरक नाही. शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी. मराठा कुणबी समाजाचे लग्नविधी, कुलदैवत, परंपरा, सण, उत्सव एकच आहेत. १ जून २००४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या त्नक्र ८३ व्या दुरुस्तीप्रमाणे मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना आरक्षणाचा लाभ मिळावा असे म्हटले आहे. वरील निर्णयावरून महाराष्ट्र सरकारला मराठा कुणबी एकच असल्याचे मान्य होते. कुणबी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र शूद वर्णाच्या शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला मात्र मिळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समाजातील मोठा घटक असणाऱ्या मराठा समाजावर हा अन्याय आहे. आज मराठा समाजातील ८० टक्के तरुण हे दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. कारण त्यांची आथिर्क परिस्थिती नसते व ग्रामीण शाळेमध्ये शिकल्यामुळे भाषेचा प्रश्ान् उद्भवतो. हा एक न्यूनगंड आहे. एकूण मराठा समाजातील ८२ टक्के लोक शेतीवर उपजीविका करत असतात. मुख्यत: निसर्गावर अवलंबून आहे. यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. जिराईत शेतीचे मालक आहेत. म्हणून दारिद्य रेषेखाली जीवन जगत असतात. आत्महत्या करणाऱ्या ३७०० पैकी ३२४६ हे मराठा कुणबी समाजातील आहेत. कर्जबाजारीपणाने व्यथित आहे. आथिर्क दुर्बलतेमुळे सामाजिक स्तरही खालावला आहे. मागासवगीर्यांची व्याख्या करताना ज्या समाजाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक आथिर्क दुर्बल आहेत व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मागासवगीर्य समजावेत. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील ८० टक्के समाज अशिक्षित आहे व ७० टक्के दारिद्य रेषेखाली जीवन जगत आहे. म्हणून तो मागासवगीर्य आहे व आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र आहे. आज मराठा समाज रोजगार हमी योजना, माथाडी कामगार, हमाली करणे अशा निकृष्ट दर्जाचे काम करून उपजीविका करत आहे. समाजाची संख्या मोठी असल्याने समस्याही खूप मोठ्या आहेत. सहकार चळवळ हे महाराष्ट्राला मराठा समाजाचे योगदान आहे. परंतु सरकारी धोरणामुळे सहकार चळवळ मोडकळीस आली आहे. राज्यकतेर् मराठा असल्यामुळे आपण मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्यास आपण जातीवादी ठरू अशी भीती बाळगतात. आजपर्यंत मराठा समाजाने स्वत:साठी ही पहिलीच मागणी केली आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाल्याने गेली अनेक वषेर् धुमसत असलेला आरक्षण समर्थक व आरक्षण विरोधक हा वाद संपुष्टात येईल व सामाजिक ऐक्य घडेल. छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला आरक्षणाचा लाभ दिला. आज शाहूंचा मराठा आरक्षणाची मागणी करतो तर त्याला आरक्षणाचे लाभधारक विरोध करतात. याचा खेद वाटतो. म्हणून धर्मवादी जातीव्यवस्था गाडण्यासाठी समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन राज्यर्कत्यांनी मनुवादाकडून मानवतावादाचा प्रवास पूर्ण करावा.
!! आन्नासाहेब चौधरी !!
Saturday, May 23, 2009
१४ मे १६५७ - संभाजी राजांचा पुरंदर गडावर जन्म

१४ मे १६५७
१४ मे १६५७ - संभाजी राजांचा पुरंदर गडावर जन्म. (ज्येष्ठ शुक्ल द्वादशी)
त्यांच्या ३५२ व्या जयंती निमित्त त्रिवार मुजरा आणि अभिवादन ... !

Thursday, February 26, 2009
मराठा आरक्षण आज काळाची गरज आहे.......?
मराठा आरक्षण कहिना आरक्षण म्हणजे काय हेच माहित नाही ज्याना आरक्षण आहे त्याना ६० वर्ष झाली ! आणि आज ही गरज खरच ज्याना ह्व्ही आहे त्याना मिळ्त नाही समाजातील गरीब लोकाना आहे मग भले तो कोणी आसो ........... आज ज्याना आरक्षण आहे त्याचा वापर पहा एक कुटुब त्या कुटुबाचे वार्षिक उत्पन एक कोटि आसो वा दाहा कोटि त्याला सर्व सवलती का तर तो ओ।बी.सी.,आणि त्याची मुले काही करत आसोत ते व्यवस्तित शिक्षण घेत नसतील तरी त्याना फी माफ़ त्याना शिष्यव्रती...........आणि आपली बाजु पहा हे एक कुटुब पहा त्याचे आई वडिल दोन वेळचे जेवायला महाग पण त्या मुलाला कुटलीही सवलत नाही तो रत्रि काम करून शिकत आसेल तरी त्याला शिक्षणात ना फीस मध्ये ना कशात सवलत तर कारण का तो मराठा त्याची जन्म घेतल्या पासूनच त्याच्या पाटीमागे ही घरदशा का तर तो मराठा मला सागा का सहन करावे आपन आपले नेते असताना ही जर ठोस निर्णय घेत नसतील तर नको मला पक्ष नको सघटना काय कामाचे आसले पक्ष........ आज कित्येक मराठ्यच्या मुलानी शिक्षण सोडून वाईट मार्गाला लागली आणि फिरायला लागली कोणाला नोकरीत पुडे जाता येत हुशार आसूंन देखिल गप्प बसावे लागते आसे का कोणी बोल्नारच नाही का मराठा मला फार दू:ख वाटले आपन मराठे आहोत हे देखिल माहित नाही.... काही मराठयाना .....? आणि मराठा समाजाला पडलेला विसर ही फार वाईट गोस्ट आहे आपन कोण होतो आणि काय झालो आपन राजकरनासाठी आणि सत्तेसाठी कुठल्याही थराला जात आहेत थाबा आता तरी ही सत्ता आमच्याच जिवावर येते स्वत:साठी नको उद्यासाठी आजुन बरेच लोक गरीब मराठा आहेत आणि ८० % लोक शेती करतात तुम्हाला नको आसेल पण ज्याच्या वर अन्याय होतो त्याचे काय ज्याची मुले रात्र न दिवस आभ्यास करतात त्याचे काय आज काही लोक जर आरक्षनाची मागणी करत आस्तिल तर आपन साथ द्या हो हो !! आरक्षण मिलालेच पाहिजे !!! भिक नाही हक्क सांगतो !! प्रगति साठी आरक्षण मागतो !! आज सगले मत भेद बाजूला ठेवा आणि एकत्र या उद्यासाठी ...? आणि आपन साथ देत नसाल तर आपणास मराठा म्ह्न्न्याचा आधिकार नाही आणि जर कोणी मराठा विरोध करत आसेल तर त्याला मला भेटायला सागा.! पक्ष कसला बगता मराठ्याचा आभिमान आसेल तर पेटून उठा आजपर्यंत लोकासाठी पेट्लात आज तरी आपनासाठी आणि उद्यासाठी मराठ्यानो विचार करा . माझ्या देहाचे तुकड़े करून जर याना जाग येत आसेल तर मी कधी ही तयार आहे ह्या देहाचे तुकड़े तुकड़े करायला....!! आन्नासहेब चौधरी !!
Tuesday, February 17, 2009
मराठा कधी ही संपणार नाही
मराठा मोडेल पण वाकणार नाही पेटतील मशाली वीझतील मशालीसुर्य कधीच विझनार नाहीप्रयत्न करा किती ही पन हे कधीच घडणार नाहीमराठा मोडेल पण वाकणार नाही मराठा मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाहीमराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाहीआणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाहीमराठा महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाहीशिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाहीसंपतील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही....!
Friday, February 13, 2009
मी मराठा आहे!होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले। मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला". दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत. इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात"...
अजुन वेळ गेलेली नाहीय जरा बदला स्वताला काय होतो आपन काय झालो आपन हे जीवन जगण्यापेक्षा आपन नाही जगलो तरी चालेल पन उद्याचे भविष घडविनारच ..........!

Thursday, January 22, 2009
Subscribe to:
Posts (Atom)