ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती Home राजमाताजिजाऊ शिवाजीराजे संभाजीराजे मराठाआरक्षण आण्णासाहेब चौधरी नौकरी: सौजन्य महान्यूज

Friday, December 18, 2009

मराठा आरक्षण आज काळाची गरज आहे.......?

मराठ्यांच्या आरक्षणाला आक्षेप घेणारे भुजबळ कोण.त्यांना कोणी दिला हा मक्ता.
नागपूर - राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या पण सामाजिक आणि आर्थिकद्‌ष्टया कमकूवत असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात हरकत नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता भूजबळ यांनी हे वक्‍तव्य केले.

महाराष्ट्र आणि देशाच्या ऐतिहासिक आणि राजकीय जडणघडणीत महत्वाचा वाटा उचलणारा मराठा समाज अद्यापही उपेक्षित आहे. समाजातील मुठभर वर्ग श्रीमंत असला म्हणजे सर्व समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे, असे मानणे चुकीचे आहे. ही परिस्थिती दुर करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे विधिमंडळासमोर धरणे आंदोलन देण्यात आले. या आंदोलनात मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड, छावा संघटनेच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील जवळपास 25 आमदारांनी घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मात्र, यावेळी विदर्भातील एकाही आमदाराला भेट देण्याचे सौजन्य दाखविता आले नाही. धरणे आंदोलनानंतर मराठा संघटनांच्या 11 जणांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि महसूलमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. राणे आणि मोघे मंत्रिमहोदयांनी 11 लोकांच्या शिष्टमंडळास मुंबई येथे वेळ देण्याचे कबूल केले. या शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, संभाजी बिग्रेडचे प्रदेश सचिव मनोज आकरे, अ.भा. मराठा महासंघाचे उपाध्यक्ष विनायकराव पवार, छावा मराठा संघटनेचे किशोर चव्हाण, आनंद आडकिणे, अ.भा. मराठा महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश साळूंके, मराठा सेवासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार शिंदे, शुधांशू मोहोड, माणिकराव जगताप, विजय गुजर आदींचा समावेश होता, अशी माहिती नागपूर जिल्हाध्यक्ष सतिश साळूंके यांनी दिली. !! आन्नासहेब चौधरी !!

No comments:

Post a Comment